PM किसान योजनापीएम किसान अर्ज पात्रता व केवयशी
E SEVA PALGHAR

योजनेचे मुख्य उद्देश:

1)आर्थिक स्थैर्य: देशातील सर्व अल्पभूधारक आणि सीमांत शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देणे .

2)शेतीसाठी पाठबळ: बियाणे, खते आणि शेतीसाठी लागणाऱ्या इतर साधनांच्या खरेदीसाठी रोख मदत पुरवणे.

3)सावकारी पाशातून मुक्ती व मुत्युचे :शेतीकामासाठी शेतकऱ्यांना व्याजी कर्ज घेण्यापासून वाचवणे आणि मुत्यु प्रमाण कमी करण्यचा प्रयत्न म्हणून हि योजना सुरु केली आहे.

४)थेट लाभ हस्तांतरण (DBT) : लाभ सरकारी मदत कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट शेतकऱ्यांच्या आधार-लिंक्ड बँक खात्यात जमा करणे, ज्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल.

टीप : आधार बँक लिंक कसे करतात बघण्यासाठी पुढील लिंक open करा.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये (२०२६ पर्यंतची स्थिती):

1)वार्षिक लाभ: लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण ₹६,००० ची मदत दिली जाते.

२)हप्ते: ही रक्कम ₹२,००० च्या तीन समान हप्त्यांमध्ये दर चार महिन्यांनी वितरित केली जाते. तर मागील हप्ता हा ऑक्टोबर – नोव्हेबर महिन्यात वितरीत झाला होता. म्हणून खूप दाट शकता आहे फेब्रुवारी-मार्च २०२६महिन्यात हप्ता येनेची.

पीएम किसान अर्ज पात्रता व केवयशी

नवीन नियम (२०२६):

१. युनिक फार्मर आयडी (Unique Farmer ID):२०२६ पासून केंद्र सरकारने सर्व लाभार्थ्यांसाठी शेतकरी ओळक पत्र’डिजिटल फार्मर आयडी‘ अनिवार्य केला आहे.

याला शेतकऱ्यांची ‘Agristak‘ म्हटले जात असून, यामध्ये जमिनीचा तपशील, पिकांची माहिती आणि आधार लिंक असेते.

 २. ई-केवायसी (e-KYC) मुदतवाढ: ज्या अर्जदार व्यक्ती लाभ मिळणे बंद झालेला असतो.त

त्यांना KYC करावी लागते.त्यांच्यासाठी सरकारने ८ मार्च २०२६ पर्यंत मुदत वाढवली आहे .

हे पूर्ण नसल्यास पुढील हप्ते थांबवले जातील .

टीप: इकडे लिंक OPEN करून KYC बदल माहिती घ्या.

३. वारसा हक्क आणि नवीन नोंदणी: मूळ लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्यांच्या वारसांना आपोआप पैसे मिळणार नाहीत.

वारसांना नवीन नियमांनुसार स्वतःच्या नावावर जमिनीच्या नोंदी करून नवीन अर्ज (विभागीय कृषीअधिकारी याचे प्रमाणपत्र) करावा लागेल .

४. जमीन पडताळणी (Land Seeding): तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असण्यासोबतच पोर्टलवर ‘Land Seeding’ स्टेटस ‘Yes’ असणे आवश्यक आहे.

जर जमिनीची कागदपत्रे पोर्टलवर अद्ययावत नसतील, तर हप्ता जमा होणार नाही

महत्त्वाची टीप: तुम्ही तुमचे स्टेटस PM-Kisan ‘Know Your Status’ वर जाऊन तपासू शकता. तिथे e-KYC, Aadhaar Seeding आणि Land Seeding या तिन्ही गोष्टींसमोर ‘Green Tick’ असणे गरजेचे आहे.

By ई-सेवा पालघर

​"Hi, I'm Sudhir Shingada! 🚀 Founder of Esevapalghar. I run a CSC & Mahaonline Center and help people through my YouTube channel: Esevapalghar. Follow me for the latest updates on government schemes, digital services, and skill training! 🇮🇳"

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *